– एसटीने भाडेवाढमध्ये परत एक रुपया चलनात आल्यामुळे प्रवाशांचे आणि वाहकांचे वाद वाढले!
लोणार (वाजिद खान) – राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवासी भाड्यांत केलेली दरवाढ वाहक व प्रवाशांसाठी चांगलीच डोकेदुखी ठरली आहे. ही प्रवासी भाडेवाढ एक रूपयातील चलनात असल्याने सुट्ट्या पैशांचा प्रश्न निर्माण झाला आहे. सुट्ट्या पैशाअंभावी वाहक व प्रवाशांत वाद वाढले आहेत.
सर्वप्रथम एसटीच्या भाडेवाढीमध्ये एक रुपया व दोन रुपये चलनामध्ये होते. परंतु मधल्या भाडेवाडीमुळ एसटीने एक रुपया व दोन रुपयाचे चलन बंद करून वाहकांचे व प्रवाशांचे होणारे वाद टाळले होते. परंतु आता दि.२५ जानेवारी २०२५ रोजीच्या नव्याने झालेल्या भाडेवाडीमुळे राज्य परिवहन महामंडळाने एक व दोन रुपयाला चलनामध्ये आणून भाडेवाढ केली आहे. त्यामुळे वाहकांमध्ये व प्रवाशांमध्ये सुट्ट्यांपैशासाठी वाद निर्माण होणार आहेत. आता मुळात एक व दोन रुपयाचे चलनच व्यवहारामधून कमी झाल्यामुळे नेमके एवढे सुट्टे पैसे आणायचे कुठून? असा प्रश्न राज्य परिवहन महामंडळाच्या वाहकांना पडला आहे. त्यामुळे याकडे सरकारने व राज्य परिवहन महामंडळाच्या अध्यक्षांसह वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
राज्य परिवहन महामंडळाने दिनांक २५ जानेवारी २०२५ रोजीपासून केलेल्या भाडेवाडीमध्ये एक व दोन रुपयाचे व्यवहार तिकिटाच्या माध्यमातून चलनात आणले आहे. प्रवाशांकडे आणि वाहकांकडे एवढे सुट्टे पैसे नसतात. त्यामुळे आता यापुढे वाहकांचे व प्रवाशांचे सुट्ट्या पैशावरून वाद निर्माण होणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासासाठी घरून निघत असताना सुट्टे पैसे जवळ ठेवावे किंवा ऑनलाईन पद्धतीने तिकीटचे पैसे द्यावे. जेणेकरून सुट्ट्या पैशावरून वाद निर्माण होणार नाही.
– सत्यनारायण परमेश्वर तेजनकर, वाहक, मेहकर आगार

