शिक्षक, कवी मनोज दरांडेंचे पुस्तक पाठ्यपुस्तकात!

admin 1 Min Read
1 Min Read

– ‘तंत्रज्ञानाची गोष्ट’ पुस्तकाची राज्य पाठयपुस्तक निर्मिती मंडळ, पुणेसाठी निवड
– ग्रामस्थांनी केला शिक्षक मनोज दराडे यांचा सत्कार

सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – तालुक्यातील देवखेड येथील जिल्हा परिषद शाळेतील उपक्रमशील शिक्षक तथा कवी मनोज दराडे यांनी लिहिलेल्या ‘तंत्रज्ञानाची गोष्ट’ पुस्तकाची महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मिती मंडळ, पुणेसाठी निवड झाल्याबद्दल गावातील राजश्री शाहू महाराज सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने संस्थापक अध्यक्ष, साहित्यिक किसन पिसे यांनी शाळेत प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेत ध्वजारोहण शाळा समितीच्या अध्यक्षा सौ. वैशाली भोसले यांच्याहस्ते करण्यात आले, तर ग्रामपंचायतीच्या कार्यालयात ध्वजारोहण सरपंच सौ. शारदा संजय आढाव यांच्याहस्ते करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या अंगभूत कलेची चुणूक दाखविल्यामुळे उपस्थित मान्यवरांनी कौतुक करून बक्षिसांचा वर्षाव करून छोट्या छोट्या मुलांना व मुलींना प्रेरित केले. व्यासपीठावर सरपंच सौ.शारदा संजय आढाव, शाळा समितीच्या अध्यक्षा सौ. वैशाली भोसले, उपाध्यक्षा सौ. शीतल शिलवंत, उपसरपंच तुकाराम चव्हाण, ग्रामपंचायत सदस्या सौ. वर्षा आढाव, श्रीमती सुमनबाई भोसले, सौ. शारदा आबासाहेब आढाव, माजी सरपंच संजय आढाव, शाळेचे मुख्याध्यापक अशोक नागरे सर, शिक्षक शिवहरी जायभाये सर, वसंतराव भोसले, वसंतराव काळे, ग्रामविकास अधिकारी बोरुळे साहेब, सोमेश्वर भोसले, त्याच बरोबर गावातील प्रतिष्ठित नागरिक , अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते.

‘खडकपूर्णा’तून कोल्हापुरी बंधार्‍यांत पाणी न सोडल्याने पिके धोक्यात; पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर!

Share This Article
Exit mobile version