उद्योगपती बाळासाहेब ससाने यांच्याकडून जिल्हा परिषद शाळेला दोन स्मार्ट टीव्ही भेट!

admin 1 Min Read
1 Min Read

– ..तर गावातील ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून दिले बेंच!

सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – तालुक्यातील केशव शिवणी येथील जिल्हा परिषद शाळेत नाशिक येथील प्रसिद्ध उद्योगपती यांनी भेट देऊन शाळेतील विद्यार्थ्यांची प्रगती व स्वच्छतेची पाहणी करून शाळेसाठी दोन स्मार्ट एलईडी टीव्हीची भेट दिली. हे पाहून गावातील नागरिकानी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी लोकवर्गणीतून बेंचची व्यवस्था करून दिली.

आज, दिनांक २९ जानेवारीरोजी केशव शिवणी येथील रहिवासी असलेले व सध्या नाशिक येथील प्रसिद्ध उद्योगपती बाळासाहेब किसनराव ससाने यांनी शाळेला भेट देऊन शालेय परिसर स्वच्छता व सौंदर्यीकरण, येथील बोलक्या भिंती, शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता, विद्यार्थांचा क्रीडा स्पर्धेतील सहभाग काही विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर झालेली निवड, प्रजासत्ताकदिनी विद्यार्थांचा सांस्कृतिक कार्यक्रमातील सहभाग या सर्व बाबी पाहून समाधान व्यक्त केले व तसेच त्यांनी लगेचच शाळेला दोन स्मार्ट एलईडी टीव्ही गावाचे सरपंच, शाळा समिती व गावकर्‍यांच्या हस्ते शाळेला सप्रेम भेट दिल्या. त्याचेच अनुकरण करून गावातील २७ नागरिकांनी शाळेत विद्यार्थ्यांना बेंचसाठी प्रत्येकी २१०० रुपये दिले आणि शाळेला आणायला सांगितले. विद्यार्थ्यांची गुणवत्ता बघून गावातील नागरिकांनी सर्व शिक्षकांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कारसुद्धा केला. या सर्व बाबीसाठी शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय देशमुख सर, राजेश चाटे, संतोष डिघोळे, किशोर दंदे, शेख अहमद, सुभाष आंधळे यांनी सर्वांचे आभार मानले.

Share This Article
Exit mobile version