बिबी (ऋषी दंदाले) – लोणार तालुक्यातील बिबी येथे पंतप्रधान कृषी सिंचन योजना ज्स्व्ेब् २.० अंतर्गत विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रामुख्याने वसंतरावजी नाईक कनिष्ठ महाविद्यालय बिबी येथील शाळेमध्ये निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या, तर दिनांक २७ जानेवारी रोजी येथील संतोषी माता मंदिराच्या प्रांगणामध्ये रांगोळी स्पर्धा व वृक्षारोपण चा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी गावातील महिलावर्ग मुलींनी मोठा सहभाग घेतला होता. या विविध स्पर्धेच्या वेळी विद्यार्थी व गावातील महिला पुरुष वर्गांना पंतप्रधान कृषी सिंचन योजनेची माहिती कृषी मंडळ अधिकारी अनिल सांगळे, कृषी पर्यवेक्षक विलास जाधव यांनी मार्गदर्शन केले. यावेळेस प्रामुख्याने सरपंच चंदाबाई गुलमोहर, रामराव इंगळे समूह संघटक, रामेश्वर सोनकांबळे सिव्हिल इंजिनिअर, श्रीकांत भुमरे कृषी सहाय्यक, कु. कविता साखरे सचिव प्रामुख्याने उपस्थित होते.

