– श्रीरामलल्ला मूर्तीस्थापना वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त करण्यात आले होते आयोजन
बिबी (ऋषी दंदाले) – अयोध्येतील श्रीरामलल्ला मूर्ती स्थापना वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्ताने बिबी येथील श्री संत गजानन महाराज संस्थान यांच्यावतीने श्री हनुमान चालिसा नामजप यज्ञाचे बुधवारी (दि.२२) आयोजन करण्यात आले होते.
यानिमित्त हनुमान चालिसाचे १०८ वेळेस पठण केले गेले. या नामजप यज्ञामध्ये बाल, वृद्ध, युवक, युवती यांनी चांगला प्रकारचा सहभाग घेतला व श्री गजानन महाराज संस्थानचे वारकरी शिक्षण संस्थांचे विद्यार्थीही यांचा सहभाग होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रीराम प्रतिमेची पूजन संस्थान विश्वस्त सारंगधर महाराज टेके, गोविंद टेके व बिबी पोलीस स्टेशनचे श्री मापारी व मापारी सर, दीपक गुलमोहर, रमेश खंडागळे, विक्रम शेरे, कृष्णा पंधे, वैभव शेळके, संदीप काकड यांच्याहस्ते पूजन करण्यात आले व कार्यक्रमाची सांगता गोपाल महाराज टेके यांनी श्री रामचंद्र प्रभूच्या नामाचा जय जयकार करून, हरिपाठ महाआरती करून व उपस्थित बाळगोपाळांना रमेशभाऊ कुरंगळ यांच्यावतीने प्रसाद वितरणाने झाली. यानिमित्त भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.

