– जिल्हा प्रशासनाने मातृतीर्थ जिल्ह्याचा घेतलेला सर्वांग सुंदर सचित्र आढावा पाहून आ. श्वेताताईंनी केले प्रशासनाचे कौतुक!
चिखली/देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे) – जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या संकल्पनेतून राज्याच्या महसूल विभागाच्यावतीने ‘मातृतीर्थ बुलढाणा जिल्हा’ ही कॉफी टेबल पुस्तिका प्रकाशित करण्यात आली असून, या पुस्तिकेत जिल्ह्याच्या गौरवशाली उपलब्धीचा आढावा घेण्यात आला आहे. ही पुस्तिका नुकतीच चिखलीचे कर्तव्यनिष्ठ तहसीलदार संतोष काकडे यांनी चिखली मतदारसंघाच्या भाग्यविधात्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांना भेट दिली. ही पुस्तिका पाहून प्रशासनाने मातृतीर्थ जिल्ह्याच्या सांस्कृतिक, औद्योगिक, विकास, पुरातन आणि ऐतिहासिक उपलब्धीचा गौरवपूर्ण आढावा घेतला आहे, असे उद्गार आ. श्वेताताई महाले यांनी काढले व जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन केले.
ही पुस्तिका ऑनलाईनही उपलब्ध असून, जिल्हावासीयांना खालील लिंकवर क्लीक करून ती वाचता येईल –
‘खडकपूर्णा’चे पाणी प्रत्येक शेतकर्याला मिळवून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही – आ. श्वेताताई महाले

