मैदानी खेळाच्या माध्यमातून सक्षम युवापिढी निर्माण होते – गजानन वायाळ

admin 1 Min Read
1 Min Read

– खंडोबा यात्रेनिमित्त अमोना येथे कबड्डी सामने!

चिखली (एकनाथ माळेकर) – मैदानी खेळाच्या माध्यमातून सक्षम युवापिढी निर्माण होते, त्यामुळे असे सांघिक खेळांचे आयोजन वाढले पाहिजेत, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन वायाळ यांनी केले. अमोना येथील खंडोबा यात्रेनिमित्त आयोजित कबड्डी सामन्यांच्या उद््घाटनप्रसंगी ते बोलत होते.

चिखली तालुक्यातील अमोना येथे दरवर्षी खंडोबा यात्रेच्या निमित्ताने कबड्डीचे सामने आयोजित केले जातात. यावर्षी उद्घाटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते गजानन वायाळ हे होते. याप्रसंगी बोलताना वायाळ म्हणाले की, मैदानी खेळ ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. मैदानी सांघिक खेळ खेळ असताना विविध जाती-धर्मातील खेळाडू एकत्र खेळतात. त्यामुळे एकोपा निर्माण होतो. सर्वधर्म समभावाचा विचार रूजवला जातो. परंतु दुर्दैवाने तरूणाई मोबाईलच्या आहारी जाऊन ऑनलाईन खेळांमध्ये वेळ घालवतात. आणि, मैदानी खेळ लोप पावत आहेत. परंतु आपण सातत्याने आयोजन करता आपले मनापासून अभिनंदन करतो, असे म्हणून गावकर्‍यांचे आभार मानले. ह्यावेळी श्रीकृष्ण मिसाळ, अंकुश थूट्टे, अक्षय सुरूशे, प्रल्हाद इंगळे, शिवदास भांदर्गे, रंगनाथ वरपे, गजानन इंगळे व पंचक्रोशीतील सर्व प्रतिष्ठित मंडळी सर्व गावकरी मंडळी व अनेक कबड्डी संघाचे खेळाडू उपस्थित होते.

Share This Article
Exit mobile version