जिल्ह्यात पावसाची विश्रांती; शेती मशागतीसह अन्य कामांना वेग

editor 1 Min Read
1 Min Read

नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी) – जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासुन पावसाने उघडकी दिली असल्याने शेती कामांना वेग आल्याचे चित्र दिसुन येत आहे. यंदा जिल्ह्यात सरासरी पेक्षा चांगला पाऊस झाला आहे.  अशातच दोन दिवसांपासुन पाऊस थांबल्याने बळीराजाच्या अनुशंगाने शेतीसाठी आवश्यक असेलले पोषक वातावरण तयार झाले आहे.  शेती मशागतीसह अन्य कामांना वेग आल्याचे चित्र नंदुरबार जिल्ह्यात दिसुन येत आहे.  जिल्ह्यात खरीप हंगामात जवळपास तीन लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली जात असते. मात्र यावर्षी पोषक वातावरण आणि वरूण राजाने दिलेली साथ मुळे कापसाच्या पेरणी क्षेत्र वाढताना दिसून येत आहे.

Share This Article
Exit mobile version