आळंदीत राज्यपालांच्या वक्तव्याचा शिवसेनेतर्फे निषेध!

breakingmah 1 Min Read
1 Min Read

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील शिवसेना युवासेना व महाविकास आघाडी यांच्या वतीने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा त्यांनी केलेल्या वक्तव्याचे निषेधार्थ त्यांचा जाहिर निषेध करण्यात आला.  महाराष्ट्र व मराठी माणूस यांचे बद्दल अनुचित वक्तव्य केल्याबाबत निषेध करून फलक झळकविण्यात आले.  राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा जाहीर तीव्र शब्दात निषेध करीत जय भवानी, जय शिवाजी, राज्यपाल गो बॅक असे म्हणत राज्यपाल यांचा जाहीर निषेध असो आदी घोषणा यावेळी शिवसैनिकानी दिल्या.
या वेळी शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख उत्तम गोगावले,  शहर प्रमुख अविनाश तापकीर,  माजी नगराध्यक्ष रोहीदास तापकीर, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे,  काँग्रेसचे पर्यावरण विभागाचे प्रमूह उमेश रानवडे, शिवसेना शहर संघटक आनंदराव मुंगसे, आशिष गोगावले, शशीराजे जाधव, राहुल सोमवंशी, संदीप पगडे, चारुदत्त रंधवे, बालाजी शिंदे, मंगेश तिताडे, राकेश जाधव, अनिकेत डफळ आदींसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि शिवसैनिक उपस्थित होते.

राज्यपालांच्या वक्तव्यामुळे मराठी माणसांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.  त्यांनी केलेल्या वक्तव्याने महाराष्ट्राचा अपमान झाला आहे.  या प्रकरणी राज्यपाल यांनी तत्काळ माफी मागावी. लोक भावना यांचा विचार करून महामहिम राष्ट्रापतीं यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालांना तात्काळ माघारी घ्यावे.  अशी मागणी यावेळी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.

Share This Article
Exit mobile version