नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी) – शहादा शहरातील गरीब नवाज कॉलनी परिसरात काल रात्री दोन दुचाकी पेटवत अज्ञातांनी खळबळ माजवण्याचा प्रयत्न केला आहे. या उपद्रव्याचा हा वाहन जाळण्याची ही सारी घटना सीसीटीव्हीत कैद झाली असुन पोलीस या उपद्रव्यांचा शोध घेत आहे. चार चाकी गाडीतुन येत या उपद्रव्यानी या परिसरातील दोन दुचाकींवर पेट्रोल टाकुन जाळुन देत, घटनास्थळावरुन पोबरा केला आहे. घटनेची माहीती कळताच शहादा पोलीसांनी घटनास्थळ गाठत तात्काळ परिस्थीती नियंत्रनात आणली.

