संतसाहित्य चारित्र्यसंपन्न माणूस घडविते : प्रा. डॉ. ज्ञानेश्वर गाडे

admin 2 Min Read
2 Min Read

– अमोना येथील विशेष श्रमसंस्कार शिबिरात व्याख्यान

देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे) – संतांचे चरित्र, विचार आणि साहित्य आजच्या युवकांना चारित्र्यसंपन्न आणि विवेकी बनविण्याचे एक उत्तम माध्यम आहे. सर्वच संतांनी स्वतः जीवनमूल्यांचा अंगीकार करून आपले संपूर्ण जीवन व्यतीत केले. उभ्या आयुष्यात संतांनी नैतिक मूल्यांशी कधी तडजोड केली नाही. नेहमीच सत्याचा आग्रह धरला. स्वतःच्या जगण्यातून एक आदर्श जगासमोर ठेवला. आजच्या युवकांनी चारित्र्यसंपन्न आणि विवेकी माणूस बनण्यासाठी संतसाहित्याची कास धरणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन संतसाहित्याचे गाढे अभ्यासक व प्रसिद्ध विचारवंत प्रा.डॉ. ज्ञानेश्वर गाडे यांनी केले.

जानकीदेवी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय देऊळगाव घुबे या महाविद्यालयाअंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेचे दत्तक ग्राम अमोना येथे सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी बौद्धिक सत्राच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जि.प.शाळा समितीचे अध्यक्ष गजानन इंगळे, प्रमुख वक्ते म्हणून हिवरा आश्रम येथील संतसाहित्याचे अभ्यासक प्रा. डॉ. ज्ञानेश्वर गाडे, संस्थेचे सचिव प्रा.उद्धवराव घुबे, जि.प.चे मुख्याध्यापक राजपूत, प्रा.आंबस्कर, प्रा.चव्हाण, प्रा.सावळे, प्रा.लांडगे, प्रा. प्रा.गजानन मिसाळ, प्रा.वानखेडे, प्रा.सौ.पुनमताई घुबे उपस्थित होते.
‘संतसाहित्यातील जीवनमूल्ये आणि आजचा युवक’ या विषयाला अनुसरून डॉ. ज्ञानेश्वर गाडे पुढे म्हणाले की, संतांचे चरित्र माणसाचे चारित्र्य घडविते. आज तरुणांनी जीवन मूल्यांचा अंगीकार करून आपले जीवन समृद्ध करावे. ढासाळत चाललेली मूल्यव्यवस्था सावरण्याची जबाबदारी आजच्या तरुणांची आहे, असे ते म्हणाले. पाहुण्यांचा परिचय प्रा.संतोष मिसाळ यांनी करून दिला. तर प्रास्ताविक प्रा.आंबस्कर सर यांनी केले. सूत्रसंचालन कु.अनुराधा दरेकर व कु.संजीवनी पेहरे यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा.उद्धवराव घुबे यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने रासेयो स्वयंसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Share This Article
Exit mobile version