भांडखोर बायको दिल्यापेक्षा आयुष्यभर मुंजा ठेव!

editor 2 Min Read
2 Min Read

भांडखोर बायको दिल्यापेक्षा आयुष्यभर मुंजा ठेव!

पत्नीपीडित पुरुष आश्रम येथे पिंपळ पौर्णिमा साजरी

गंगापूर (गुलाब वाघ) : गंगापूर तालुक्यातील करोडी येथे चक्क, आयुष्यभर अविवाहित (मुंजा) ठेव म्हणून पत्नी पीडित पुरुष आश्रम येथे पिंपळ पौर्णिमा साजरी करण्यात आली. भांडखोर बायकोपेक्षा मुंजा बरा म्हणत पत्नीपीडितांनी वडाला कालच साकडे घालत व फेर्‍या मारून बायकोच्या जाचातून सुटका मागितली.

ज्या प्रमाणे महिला ह्या वटसावित्री पौर्णिमाच्या दिवशी वटवृक्षाची पूजा करून त्यास साकडे घालतात कीं हाच पती सात जन्म मिळू दे, त्या प्रमाणे पत्नी पीडितांच्या बायकादेखील नवर्‍याला जिवंतपणी मरण यातना देतात व वटपौर्णिमेच्या पवित्र दिवशी वटवृक्षाची पूजा करतात, मग ती पूजा नेमकी कुणासाठी? व कश्यासाठी एकीकडे नवर्‍याला असह्य वेदना द्यायच्या व दुसरीकडे वटपोर्णिमा साजरी करून पती प्रेमाचा आव आणायचा. वटपोर्णिमा साजरी करण्याने सात जन्म लाभलेला पती मिळत असेल तर पिंपळ हा मुंजा आहे म्हणून पत्नीपीडित पुरुष संघटनेच्यावतीने वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला पिंपळ पूजन करण्यात आले व मुन्जाला साकडे घातले कीं ‘हे मुंजा आम्हाला अश्या भांडखोर बायका देऊन मरण यातना दिल्यापेक्षा कायम स्वरूपी मुंजा ठेव,’ हे मुंजा हे यमराजा उद्या वाटपौर्णिमेला आमच्या बायका येऊन तुला खोटे साकडे घालतील त्यामुळे त्यांचे काही एक ऐकू नकोस अश्या बायकांच्या ताब्यात जाण्यापेक्षा तुझाच सहारा चांगला ‘ . त्यामुळे त्यांचे काही एक ऐकू नको अश्या भांडखोर बायका आम्हाला सात जन्म तर काय पण सात सेकंद देखील नको . असे म्हणून कालच पत्नी पीडितांनी ‘पत्नी पीडित पुरुष आश्रमात एकत्र येऊन पिंपळ पौर्णिमा साजरी केली. यावेळी आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. भारत फुलारे, भाऊसाहेब साळुंके , पांडुरंग गांडुळे, सोमनाथ मणाळ, चरणसिंग गुसिंगे, भिक्कन चंदन, संजय भांड , बनकर, नाटकर , कांबळे आदि पत्नी पीडित व सह पीडित मोठ्या संखेने उपस्थित होते.

Share This Article
Exit mobile version