नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी) – नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा – दोंडाईचा रस्त्यावर अनरदबारी टेकडीजवळ आज एका बुलेट गाडीचा स्फोट होवुन तिने पेट घेतल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत शहादा शहरातील नितीन नगर मध्ये राहणारे प्रकाश तिरमले हे गंभीर जखमी झाले आहेत. दुचाकीने नेमका कशामुळे पेट घेतला हे अद्यापही कळु शकले नसले तरी घटनेमुळे या रस्त्यावर एकच धावपळ उडाली होती. यावेळी घटनास्थळी जखमी होवुन पडलेल्या चालकांना उपचारासाठी शहाद्यातल्या खाजगी रुग्णलायत दाखल करण्यात आले आहे.

