आ. श्वेताताई महाले यांनी केले तोरणवाडा येथे मतदान; व्यक्त केला विजयाचा आत्मविश्वास!

admin 1 Min Read
1 Min Read

चिखली (तालुका प्रतिनिधी) – महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत दि. २० नोव्हेंबर रोजी राज्यात सगळीकडे मतदान पार पडले. २३ – चिखली विधानसभा मतदारसंघात महायुतीतर्पेâ निवडणूक लढवणार्‍या भारतीय जनता पक्षाच्या आमदार श्वेताताई महाले यांनी तालुक्यातील तोरणवाडा येथे कुटुंबीयसह मतदान केले. यावेळी त्यांनी आपण केलेल्या विकासकामांची पोच पावती जनता आपल्याला देणार असल्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचा आत्मविश्वास व्यक्त केला.

चिखली मतदारसंघातून सलग दुसर्‍यांदा भाजपाच्या उमेदवार म्हणून निवडणूक मैदानात उतरलेल्या श्वेताताई महाले, त्यांचे पती व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सचिव विद्याधर महाले, मुलगा राजन्य महाले यांच्यासह महाले कुटुंबीयांनी आज सकाळीच तोरणवाडा येथील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक चिखली मतदारसंघात महायुतीची उमेदवार म्हणून प्रचार पूर्ण केल्यानंतर आज मतदार म्हणून माझी भूमिका मी निभावली. जात, धर्म, पक्ष असा कुठलाही भेदभाव न बाळगता मी केलेल्या विकासकामांची जाणीव ठेवून लोकांच्या आशा आकांक्षांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मायबाप जनता मला पुनश्च एकदा देईल असा मला आत्मविश्वास वाटतो ‘ अशा शब्दात मतदान झाल्यानंतर आ. श्वेताताई महाले यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

Share This Article
Exit mobile version