कारने दुचाकीस्वारांना उडवले; दोघे गंभीर जखमी

editor 1 Min Read
1 Min Read

नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी) –  धडगाव शहादा रस्त्यावरील दरा पिपराडी गावाजवळ दुचाकी व स्विफ्ट डिझायर कारचा भीषण अपघात झाला आहे.  कार चालकाने दुचाकीला जबर धडक दिल्याने दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले आहेत.  जखमींना तसेच साेडून कारचालक पळून गेला आहे.

धडगाव– शहादा रस्‍त्‍यावरील झालेल्‍या अपघातात नवलसिंग महादू पावरा (रा. रोशमाळ बु.) व रतिलाल कलशा पाडवी (रा. कुंडल, ता. धडगाव) हे रस्त्याच्या कडेला फेकले गेले. यात ते गंभीर जखमी झाले आहे.  घटनास्थळी म्हसावद पोलीस दाखल झाले असून जखमींना तत्काळ म्हसावद ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.  याबाबत अधिक तपास म्हसावद पोलीस करीत आहे.

Share This Article
Exit mobile version