बिबीच्या सरपंच चंदाबाई गुलमोहर यांना आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर

admin 1 Min Read
1 Min Read

बिबी (ऋषी दंदाले) – तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटना व राजमाता माँ जिजाऊ स्वयंसहायता महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने बिबी गावातील जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन काम करणार्‍या आणि आपल्या समर्थ नेतृत्वाने गावाचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी सदैव कार्यरत राहणार्‍या बिबी ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती चंदाबाई उत्तमराव गुलमोहर यांना आदर्श सरपंच पुरस्कार-२०२४ चा जाहीर करण्यात आला आहे.

यावेळी सरपंचताई यांच्यावर गावकर्‍यांच्यावतीने शुभेच्छाचा वर्षाव करण्यात आला. यावेळी सरपंच ताई यांनी आदर्श सरपंच पुरस्कारचे श्रेय हे बिबीवासीय यांना दिले आहे. याप्रसंगी गावातील नागरिक संतोष बनकर, रियाज भाई, संदीप खुळे, श्रीमत आटोळे, कृष्णा पंधे, कैलास मोरे, बंडू इवरे, विजय बनकर, राठोड आदी उपस्थित होते.

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट!

Share This Article
Exit mobile version