गणेशोत्सवानिमित्त बिबी येथे रक्तदान शिबीर

admin 1 Min Read
1 Min Read

बिबी (ऋषी दंदाले) – येथील श्रीराम प्रतिष्ठान आयोजित श्रीराम गणेश मंडळ बिबी यांनी श्री गणेश उत्सव पर्वानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात तब्बल ५१ गणेश भक्तांनी रक्तदान करून गणरायांना अनोखी वंदना केली.

या रक्तदान शिबिराची सुरवात ही गणरायांच्या आरतीने झाली. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बिबी पोलिस स्टेशन चे ठाणेदार संदीप पाटील, माजी सरपंच बबन बनकर, सरपंचपुत्र दीपक गुलमोहर, अमोल मुळे, बद्रिमामा बाहेती, रमेश आंधळे, प्रवीण धाईत, नीलेश भांगडीया, संदीप बनकर, केशव डाहाळके, डॉक्टर असोसिएशन यांची उपस्थिती होती. या शिबिरात तब्बल ५१ रक्तदात्यानी रक्तदान केले. नंतर श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनुभाऊ कायंदे, उपाध्यक्ष अभिषेक भालेराव, सचिव आकाश बनकर, कार्तिक धाईत, चेतन ढाकणे, महेश धाईत, सागर मुर्तडकर, गोलू मुर्तडकर, विशाल मुर्तडकर, तुषार मुर्तडकर, धनु सानप, ओम मुळे, बाळू दिनोदे, नूतन काळूशे यांनी सर्व रक्तदात्यांचे प्रमाणपत्र देऊन आभार मानले. त्याच प्रमाणे पूर्ण रक्तदान शिबिर पूर्णत्वास नेण्यासाठी श्रीराम प्रतिष्ठान व श्रीराम गणेश मंडळच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

Share This Article
Exit mobile version