अपघातात मेलेल्या वानरावर ग्रामस्थांकडून अंत्यसंस्कार

editor 1 Min Read
1 Min Read

पाचोड/धूळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दाभरूळ ता.पैठण येथे दोन वानराला अज्ञात वाहनांने धडक दिल्याने दोन्हीही वानर जागीच ठार झाल्याची घटना (दि.१३)घडली.

राष्ट्रीय महामार्गावरील दाभरूळ येथे गावात अन्न पाण्याच्या शोधात वानर आलेले होते,मात्र सकाळी सोमवारी रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास एक वानर हे रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. यात एक  वानर जागीच ठार झाले तर दुपारी तीनच्या दरम्यान दुसरे वानरही बाजूच्या शेतातून गावाकडं येत असताना माहामार्गावर आले त्यावेळी त्या वानरालाही एका अज्ञात वाहनाने उडविले या घटने माहीती शेतकऱ्यांना व गावातील नागरिकांना कळताच त्यांनी घटना स्थळी धाव घेतली. त्यानंतर मृत्यूमुखी पडलेल्या वानराला नितीन टकले, जगनाथ जाधव,प्रभु गायकवाड,वामन जाधव,वाळू कुलट शेताच्या बाजूला खड्डा खोदत लाल कापड,फुले आणून अंत्यसंस्कार केले.

Share This Article
Exit mobile version