बीट जमादाराने मारहाण केली; त्याने जीव दिला!

editor 1 Min Read
1 Min Read

– मृतदेह पोलिस ठाण्यात ठेवला
पाचोड/पैठण (विजय चिडे)
पैठण तालुक्यातील दाभरुळ येथील एका चोवीस वर्षीय तरुणाने जामखेड ता.अंबड शिवारात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना (दि.१३) रोजी दुपारी घडली.मात्र ही घटना पाचोड पोलीस कर्मचार्‍यांनी मारहाण केल्यामुळे, त्याने ही आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईक करीत आहे.


नातेवाईकांच्या माहितीनुसार, दाभरुळ तांडा येथील एका विवाहितेने पाचोड पोलिसांत तक्रार दिलेली आहे. त्यात हुंड्याचे पैसे कमी दिली त्याचबरोबर सध्या क्रुझरगाडी घेण्यासाठी माहेरून पैसे आणण्यास सांगून शारीरिक व मानसिक छळ केल्याचा आरोप होता. या तक्रारीवरून दाभरूळ तांडा येथे पत्नीसह कुंटुबातील सहा जणांविरूध्द पाचोड पोलिस ठाण्यांत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे संबंधित पोलिस बीट जमादारने मोहन गोरख राठोड याला पोलिस ठाण्यांत बोलून शनिवारी (दि.११) रोजी मारहाण केल्यामूळेच त्याने आत्महत्या केली असल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांने केला आहे. यामुळेच या तरुणाचा मृत्यूदेह पाचोड पोलीस ठाण्यात ठेवण्यात आला होता. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. संबंधित दोषीवर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Share This Article
Exit mobile version