– कु. रेणुका घुबे हिचीही आरोग्य विभागासह तलाठी पदावरही झाली निवड
– गावातील कर्तबगार बहीण-भावाची गावातून मिरवणूक; ग्रामस्थांचा आनंद गगणात मावेना!
– गावातील कर्तबगार बहीण-भावाची गावातून मिरवणूक; ग्रामस्थांचा आनंद गगणात मावेना!
देऊळगाव घुबे, ता. चिखली (राजेंद्र घुबे) – येथील सचिन राजेंद्र घुबे यांनी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन त्यांची राज्य पोलिस दलात पोलिस उपनिरीक्षक (फौजदार) पदावर निवड झाली आहे. त्यांचे वडिल पंधरा वर्षांपूर्वी वारल्यानंतर त्यांच्या आईने शेतात कबाडकष्ट करून सचिन यांना शिकवले. त्यांनीदेखील आईच्या कष्टाचे चीज करत फौजदार पदाला गवसणी घालून गावाचा लौकिकही वाढवला. यासह गावातीलच कु. रेणुका घुबे हिने तलाठी परीक्षेसह आरोग्य विभागाची स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केली, व दोन्ही ठिकाणी तिची निवड झाली. तथापि, महसूल सेवेत जाण्याचा निर्णय तिने घेतला आहे. सचिन व रेणुका या दोघाही भावा-बहिणीची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. गावातील माता-भगिनींनी त्यांना ओवाळून या यशाबद्दल त्यांचे औक्षण केले.
आजचा दिवस देऊळगाव घुबेवासीयांसाठी एक कौतुकास्पद दिवस
आज देऊळगाव घुबे येथील सचिन राजेंद्र घुबे यांची पोलीस उपनिरीक्षकपदी, जानकीदेवी विद्यालयाची विद्यार्थिनी रेणुका प्रल्हाद घुबे हिची जिल्हा ग्रामीण रुग्णालयामध्ये व सोबतच तलाठी म्हणून निवड, तर निवृत्ती संजय सावळे याची संभाजीनगर येथे पाटबंधारे प्रकल्प अधिकारी.पदावर निवड. तसेच, नागेश सुनील सुर्वे याची SRPF निवड झाल्याने चौघांचीही गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. फटाक्यांच्या आतषबाजीत गावातील महिलांनी सर्वांचे पूजन करून सर्व गावकऱ्यांच्यावतीनी जंगी स्वागत व सत्कार करण्यात आले. त्यावेळी मोठ्या संख्येने गावातील नागरिक आणि महिला, तरुण, तरुणी उपस्थित होत्या.
———–

