जातवैधता प्रमाणपत्रप्रकरणी ठाकर समाजाचे आ. नीतेश राणेंना साकडे!

breakingmah 1 Min Read
1 Min Read

– लवकरात लवकर तोडगा काढू ; आ. नीतेश राणेंचे आश्वासन

कणकवली (मयुर ठाकूर) – समाजासह विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विविध अडचणी येत असल्याने सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाज नूतन कार्यकारिणीने आमदार नीतेश राणे यांची भेट घेतली, व याप्रश्नी त्यांच्याकडे साकडे घातले. त्यावर याप्रश्नी लवकरात लवकर तोडगा काढू, अशी ग्वाही आ. राणे यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाजचे नूतन अध्यक्ष शशांक आटक यांच्यासह नूतन कार्यकारिणीने कणकवली – देवगड – वैभववाडी मतदारसंघाचे आमदार नीतेश राणे यांची भेट घेतली. दरम्यान, आमदार राणे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाच्या माध्यमातून जे विद्यार्थी जात पडताळणीसाठी प्रयत्न करत आहेत, त्यांना जातवैधता ( पडताळणी ) प्रमाणपत्र वेळीच मिळाले पाहिजे. असे त्या निवेदनाच्या माध्यमातून मागणी करण्यात आली होती. यावेळी आमदार नीतेश राणे यांनी सदरच्या मागणीवर लवकरात लवकर तोडगा काढला जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाज नूतन अध्यक्ष शशांक आटक, सचिव सुजित गंगावणे, कार्यकारणी मधील साबाजी उर्फ बाळा मस्के, दादा ठाकूर, रुपेश गरुड व माजी कार्याध्यक्ष निलेश ठाकूर व वैभव ठाकूर उपस्थित होते.

Share This Article
Exit mobile version