– अजित पवारांच्या साथीचा विधानसभेलाही फटका बसण्याची शक्यता!
मुंबई (विशेष प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकीत राज्यामध्ये मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागलेल्या भारतीय जनता पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकीतही दिलासादायक वातावरण नसल्याचे राज्यातून पुढे आले आहे. गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये शंभरी ओलांडत राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपची चिंता अंतर्गत सर्वेक्षणामुळे वाढली आहे. लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही भाजपला मोठे नुकसान होण्याची शक्यता सर्वेमधून वर्तवण्यात आली असून, आगामी निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना व शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यात अनुकूल मत असल्याचे निरीक्षणही पुढे आलेले आहे.
भाजपला विधानसभा निवडणुकीत केवळ ५५ ते ६५ जागा मिळू शकतात, असा सर्वेक्षणाचा अंदाज आहे. न्यू इंडियन एक्स्प्रेसनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. २०१४ मध्ये भाजपनं राज्यात १२२ जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी भाजप स्वबळावर लढला होता. तर २०१९ मध्ये शिवसेनेसोबत युतीत लढलेल्या भाजपनं १०५ जाागांपर्यंत मजल मारली होती. पण यंदा भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. आता भाजपची सर्व मदार सरकारी योजना आणि मतांच्या ध्रुवीकरणावर आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी मोफत योजना व आश्वासनांची खैरात राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार वाटत असले तरी त्यातून सरकारची जनमाणसात नकारात्मकच प्रतिमा तयार झालेली आहे. हे रेवडी सरकार पुन्हा सत्तेवर येणे शक्य नसल्याची शक्यता राजकीय धुरिणांकडून वर्तविली जात आहे. भाजपच्या मदतीने आपण पुन्हा सत्तेत येऊ याची खात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वाटते. पण भाजपची चिंता अंतर्गत सर्वेक्षणामुळे वाढली आहे. भाजपला विधानसभा निवडणुकीत केवळ ५५ ते ६५ जागा मिळू शकतात, असा सर्वेक्षणाचा अंदाज आहे. २०१४ मध्ये भाजपने राज्यात १२२ जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी भाजप स्वबळावर लढला होते. तर २०१९ मध्ये शिवसेनेसोबत युतीत लढलेल्या भाजपने १०५ जाागांपर्यंत मजल मारली होती. पण यंदा भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. आता भाजपची सर्व मदार सरकारी योजना आणि मतांच्या ध्रुवीकरणावर अवबंलून असल्याचेही राजकीय सूत्राने सांगितले आहे.
————–

