आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याअंतर्गत श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या वैभवी पादुका पालखी सोहळ्याचे परंपरेने माऊली मंदिरात हरिनाम गजरात आगमन झाले. हजारो वारकरी भाविकांचे उपस्थितीत सोहळा हरिनाम गजरात आळंदीत परतला. यावर्षी लाखो भाविकांचे उपस्थितीत पायी वारी सोहळा राज्यात साजरा करण्यात आला. पंढरीत श्रीविठ्ठल देव भेट , गोपाळपुर काला उरकून श्रींचे वैभवी पादुका पालखी सोहळ्याचे हजारो भाविक, वारकरी, नागरिकांच्या उपस्थितीत हरीनाम जयघोषात सोहळा मंगळवारी ( दि. ३० ) अलंकापुरीत गोरज मुहूर्तावर सव्वासहाचे दरम्यान आळंदीत प्रवेशाला. परंपरेने बुधवारी ( दि. ३१ ) आळंदीत आषाढी एकादशी सोहळा हरिनाम गजरात साजरा होत आहे. यावेळी श्रींचे पालखी रथावर पुष्पवृष्टी नगरपरिषदे तर्फे करण्यात आला.
आळंदीत श्रींचे सोहळ्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. रांगोळ्यांचे पायघड्या, पुष्पसजावट करण्यात आली. ठिकठिकाणी माऊली भक्त मंडळांनी श्रींचे पालखीवर पुष्प वर्षाव करीत स्वागत केले. भाविकांना विविध ठिकाणी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. आळंदीतील प्रथा परंपरांचे पालन करीत श्री नरसिव्ह सरस्वती स्वामी महाराज यांचे मूळपीठ येथे ह. भ. प. अवधूत महाराज चक्रांकित आणि परिवाराचे वतीने पिठलं भाकरी चा महाप्रसाद वाटप करण्यात आला. यासाठी भाविकांनी परंपरा जोपासत महाप्रसादास गर्दी केली. अनेक दिवसांचे विरहानंतर श्रींचे पालखी सोहळा आळंदीत येताच येथे चैतन्य अवतरले. मोठ्या ज्ञानभक्तीमय वातावरणात आळंदीकरांचे वतीने सोहळ्याचे स्वागत आळंदी नगरपरिषद, आळंदी देवस्थान व ग्रामस्थांचे वतीने व्यवस्थापक माऊली वीर, आळंदी नगरपरिषद प्रशासक मुख्याधिकारी कैलास केंद्रे, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे विश्वस्त प्रकाश काळे, अध्यक्ष सुरेश वडगावकर, माजी नगरसेवक अशोक उमरगेकर, ज्ञानेश्वर रायकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, पोलीस नाईक मच्छिंद्र शेंडे, दिघी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, मंडलाधिकारी राजेंद्र वाघ, आळंदी जनहित फाउंडेशन अध्यक्ष राजेंद्र घुंडरे पाटील, आजी, माजी पदाधिकारी, विविध सेवाभावी संस्था, संघटना यांचे वतीने करण्यात आले.
यावेळी वारकरी शिक्षण संस्थेच्या शालेय मुलांनी रस्त्याचे दुतर्फा उभे राहून तसेच सोहळ्यात धाकट्या पादुका ते आळंदी असा प्रवास करीत सोहळ्याचे हरिनाम गजरात स्वागत केले. या पालखी सोहळ्यात सर्व प्रकारच्या सेवा सुव्यवस्थित आणि सुसज्ज व्यवस्था, भोजन व्यवस्था, पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात देत सोहळ्याचे चोख नियोजन झाले. उत्साही आनंदात पायी वारी करीत सोहळा वरुणराजाचे संततधारेत सोहळा आळंदीत आला. उपव्यवस्थापक तुकाराम माने, श्रीधर सरनाईक यांनी श्रींचे सोहळ्यात प्रथा परंपरांचे पालन करीत देवस्थानचे नियंत्रणात कामकाज पाहिले. पालखी सोहळा मालक राजेंद्र आरफळकर यांनी सोहळ्याचे यशस्वीतेस विशेष परिश्रम घेतले. आळंदी शहरात भाविकणासाठी हुंबे महाराज, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे विश्वस्त प्रकाश काळे, आळंदीकर ग्रामस्थ, विविध सेवाभावी संस्था, व्यक्ती यांनी प्रसाद वाटप केले.
———-
आळंदी सोहळ्यात पोलिस मित्रांचे कौतुक
आळंदीतील पोलिस मित्र युवा महासंघ,पोलीस मित्र वेल्फेअर फाउंडेशन यांचे पदाधिकारी शिवाजी जाधव, योगेश जाधव, प्रवीण बोबडे, ज्योती पाटील, किरण कोल्हे, बाबासाहेब भंडारी, वैभव दहिफळे आदींनी आषाढी वारीत बंदोबस्तासाठी सेवा व मदत कार्य करीत पोलीस प्रशासनास सहकार्य केले. पोलिस मित्र परीवाराने केलेल्या सेवा कार्याचे कौतुक पोलीस प्रशासनाने केले आहे. आळंदी परिसरात पोलीस मित्र सेवा यावर्षी हि प्रभावी देण्यात आली. संवाद साधून पोलीस प्रशासनास सहकार्य केल्याने पोलीस मित्रांची भेट घेऊन पोलीस प्रशासनाने संवाद साधला.

