मस प्रकल्पात पोहायला गेलेला युवक बेपत्ता

editor 1 Min Read
1 Min Read

खामगाव – मस प्रकल्पात पोहायला गेलेला युवक बेपत्ता झाला. ही घटना १३ जून रोजी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस व महसूल प्रशासानाने शोध कार्य सुरु केले आहे.
खामगाव तालुक्यातील अटाळी येथील गजानन वसंता गिरी वय ३८ हा १३ जून रोजी मित्रांसोबत दुपारच्या सुमारास मस प्रकल्पात पोहायला गेला. पाण्यात उतरल्यावर पाण्यात अंदाज न आल्याने तो बुडाला व वर आलाच नाही. त्यामुळे सोबत असलेल्या मित्रांनी गजाननचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही.यावेळी या घटनेची माहिती अटाळी येथील ग्रामस्थांना मिळताच त्यांनी मस प्रकल्पाजवळ धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच खामगाव ग्रामीण पोस्टेचे ठाणेदार सुरेश नाईकनवरे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून शोध कार्य सुरु केले. तसेच तहसीलदार अतूल पाटोळे हे सुध्दा घटनास्थळी पोहचले आहेत. मात्र अद्यापही गजानन गिरी हा मिळाला नसून शोध कार्य सुरु आहे.

Share This Article
Exit mobile version