– मिसाळवाडी, मेरा, भरोसा येथील तोट्या चोरीचाही लवकरच लागणार छडा!
– ठाणेदार संग्राम पाटील, डीबी पथकाचे प्रमुख नितीनसिंह चौहाण यांची धडाकेबाज कारवाई!
– ठाणेदार संग्राम पाटील, डीबी पथकाचे प्रमुख नितीनसिंह चौहाण यांची धडाकेबाज कारवाई!
चिखली (महेंद्र हिवाळे) – चिखली पोलिस ठाणेहद्दीतून स्प्रिंकलरच्या तोट्या चोरणार्या टोळीसह या तोट्या विकत घेणार्या मेहकर येथील एका व्यापाराला चिखली पोलिसांच्या डीबी पथकाने जेरबंद केले आहे. चोरट्यांकडून तोट्यांसह सुमारे १ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून, आरोपींनी गोद्री येथील चोरीची कबुली दिली आहे. चिखली तालुक्यातील मिसाळवाडी, मेरा परिसर, भरोसा येथील शेतकर्यांच्याही स्प्रिंकलरच्या तोट्या चोरीस गेलेल्या आहेत. या चोर्यादेखील याच टोळीने केलेल्या असण्याचा संशय असून, त्यादृष्टीने पोलिस कसून तपास करत आहे. या आरोपींना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.
स्प्रिंकलरच्या तोट्या चोरल्यानंतर हे आरोपी मेहकर येथील व्यापारी रमेश अनंतराव मैंद याच्याकडे त्या विकत होते. डी बीच्या पथकाने या व्यापार्याच्या दुकानावर धाड घातली असता, तेथे स्प्रिंकलर तोट्या मिळून आल्या. या व्यापार्याची चौकशी केली असता, त्याने या चोरट्यांकडून तोट्या घेतल्याची कबुली दिली. तसेच, त्याच्याकडून तोट्या व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला. या सर्व आरोपींना रितसर अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी दिली आहे. त्यांच्या चौकशीतून इतर ठिकाणी झालेल्या स्प्रिंकलर चोर्यांचीही माहिती हाती येईल, असा पोलिसांना विश्वास आहे. फौजदार नितीनसिंह चौहाण यांनी मोठ्या शिताफीने केलेल्या तपासामुळे स्प्रिंकलर तोट्यांची चोरी करून शेतकर्यांच्या नाकात दम आणणार्या टोळीला जेरबंद करण्यात यश आल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. अटक केलेल्या एकूण सात आरोपींकडून स्प्रिंकलर तोट्या, तोट्यांचे तुकडे व भंगार, मोबाईल व गुन्ह्यात वापरलेल्या मोटारसायकली असा एकूण एक लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. ही कामगिरी पोलिस अधीक्षक, अप्पर पोलिस अधीक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली व चिखलीचे ठाणेदार संग्राम पाटील यांच्या सूचनेनुसार डीबी पथकाचे प्रमुख व धडाकेबाज अधिकारी नितीनसिंह चौहाण यांनी पोलिस नाईक अमोल गवई, पोकॉ प्रशांत धंदर, पंढरीनाथ मिसाळ, नीलेश सावळे, रोहीदास पंढरे, सागर कोल्हे, राहुल पायघन, राजेश मापारी, मपोकॉ रुपाली उगले, मपोहेकों माया सोनोने यांच्यासह तपास अधिकारी पोहेकॉ विकास देशमुख, पोकॉ संतोष जाधव पोलीस स्टेशन चिखली यांनी केली आहे.

