– गुरूवारी जिल्ह्यात येणार; शेगाव येथे संत गजाननांच्या दर्शनाला जाणार!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – मानवी देह तसा नश्वर असल्याने तो कोणाच्या तरी कामी पडावा, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवत नवनियुक्त केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प जाहीर केला. आज, दि.११ जूनरोजी दिल्लीत आपल्या आरोग्य व कुटुंब कल्याण स्वतंत्र प्रभार राज्यमंत्रीपदाचा पदभार त्यांनी स्वीकारला, व लगेचच मरणोत्तर देहदान करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. दरम्यान, गुरूवारी ते जिल्ह्यात परत येणार असून, शेगाव येथे संत गजानन महाराजांच्या दर्शनाला जाणार आहेत. त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी चालवली आहे.
Contents
– गुरूवारी जिल्ह्यात येणार; शेगाव येथे संत गजाननांच्या दर्शनाला जाणार!बुलढाणा (बाळू वानखेडे) – मानवी देह तसा नश्वर असल्याने तो कोणाच्या तरी कामी पडावा, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवत नवनियुक्त केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प जाहीर केला. आज, दि.११ जूनरोजी दिल्लीत आपल्या आरोग्य व कुटुंब कल्याण स्वतंत्र प्रभार राज्यमंत्रीपदाचा पदभार त्यांनी स्वीकारला, व लगेचच मरणोत्तर देहदान करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. दरम्यान, गुरूवारी ते जिल्ह्यात परत येणार असून, शेगाव येथे संत गजानन महाराजांच्या दर्शनाला जाणार आहेत. त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी चालवली आहे.

