ट्रकची टिप्परला समोरून धडक; एक ठार, एक गंभीर जखमी

editor 1 Min Read
1 Min Read
बिबी (ऋषी दंदाले) – मेहकर-जालना महामार्गावरील किनगावराजानजीक दिनांक ५ मेच्या रात्री ११ वाजेच्या सुमारास समोरून विरुद्ध दिशेने येणार्‍या ट्रकने टिप्परला जबर धडक दिली. यामध्ये टिप्पर चालक प्रवीण मुळे यांचा जागीच मृत्यू झाला असून, ट्रकचालकसुद्धा गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

सविस्तर असे, की टिप्पर चालक प्रवीण मुळे हे दुसरबीडवरून सिंदखेडराजाकडे जात असताना, ट्रक चालक पुंजाराम कोसरे हे सिंदखेडराजाहून दुसरबीडकडे येत होते. किनगावराजादरम्यान कोसरे यांनी त्यांच्या ताब्यातील ट्रक भरधाव व निष्काळजीपणे विरुद्ध दिशेने चालवून टिप्परला समोरून जबर धडक दिली. यामध्ये टिप्पर चालक प्रवीण मुळे राहणार खंडाळा, ता. लोणार यांचा जागीच मृत्यू झाला, तर स्वतः पुंजाराम कोसरे, रा. पोरगव्हाण, ता. आष्टी, जि. धुळे हासुद्धा गंभीर जखमी झाला आहे. अशा प्रकारच्या बाळकृष्ण काटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किनगावराजा पोलीस स्टेशनमध्ये ट्रक चालकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेचा पुढील तपास किनगावराजा पोलीस स्टेशनचे विष्णू मुंडे हे करीत आहेत.

Share This Article
Exit mobile version