आळंद येथे अश्लील शिविगाळ करून विवाहितेला मारहाण

editor 1 Min Read
1 Min Read
देऊळगावराजा (राजेंद्र डोईफोडे) – घरासमोर राहणार्‍या दारूड्या शेजार्‍याने विवाहितेला अश्लील शिविगाळ करून चापट-बुक्क्यांनी मारहाण करून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यातील आळंद येथे घडला आहे. याबाबत देऊळगावराजा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सविस्तर असे, की आळंद येथील समाधान विठोबा खार्डे या दारूडा फिर्यादी सौ. अनुराधा शिवाजी खार्डे (वय ३९) रा.आळंद यांच्या घरासमोर राहतो. तो दारु पिवून विनाकारण अश्लील भाषेत शिवीगाळ करु लागला म्हणून फिर्यादी यांनी त्यास तू असे शब्द बोलू नको असे म्हटले असता, तो आणखी शिवीगाळ करु लागला. म्हणून फिर्यादीचे पती विचारण्यासाठी गेले असता, त्याने फिर्यादीच्या पतीचा गळा पकडून त्यांना खाली पाडले. त्यामुळे त्यांचे गळयाजवळ नख लागले. हे पाहून मुलगी हे भांडण सोडविण्याकरीता गेली असता त्याने मुलीलासुध्दा अश्लिल शिवीगाळ करुन चापट मारली. माझ्याविरुध्द रिपोर्ट दिला तर तो पैसे भरुन रिपोर्ट सॉल्व करण्याची धमकीही या दारूड्याने दिली. आरोपी समाधान विठोबा खार्डे, रा. आळंद यापासून फिर्यादीस व त्यांचे कुटुंबाच्या जीवितास धोका आहे. अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट व मेडिकल रिपोर्टवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करुन पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या आदेशाने सहाय्यक फौजदार गीते यांच्याकडे देण्यात आला आहे. लवकरच आरोपीच्या मुसक्या आवळल्या जाणार असल्याचे कळते आहे.

Share This Article
Exit mobile version