श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात ३० एप्रिलपासून अखंड नामजप यज्ञ सप्ताहास सुरूवात

editor 1 Min Read
1 Min Read
देऊळगावराजा (संदीप म्हस्के) – श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथीनिमित्त श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, भगवानबाबा नगर, देऊळगावराजा येथे अखंड नामजप यज्ञ सप्ताहाला दिनांक ३० एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. दिनांक ६ मे पावेतो चालणार्‍या या पारायण कालावधीमध्ये १०१ महिला व १३ पुरुषांनी सहभाग घेतला आहे. दररोज सकाळी ५.३०ते १०.३० पावतो पारायण होणार आहे.

श्री गुरुचरित्र वाचन सामूहिक पद्धतीने केल्या जात आहेत, तसेच यामध्ये भागवत पारायण, नवनाथ पारायण, श्रीपद श्री वल्लभ यांचे वाचनसुद्धा करण्यात येत आहे. या पारायण सोहळ्यामध्ये पूजेचे मानकरी गिरीष वाघमारे व सौ.शिवगंगा वाघमारे आहेत. पूजेचे व्यासपीठ सौ.तारा गजानन डोईफोडे, व सौ.कमल खांडेभराड सांभाळत आहेत. सप्ताहाच्या यशस्वीेतेसाठी केंद्रप्रमुख शिवहरी मांटे, सौ.ज्योती मांटे, सौ. तारा डोईफोडे, सौ.वंदना तोरडमल, सौ. चंदा नवले, सौ. पुष्पा गाडेकर, गजानन डोईफोडे, विजय तोरडमल, चव्हाण, अशोक गाडेकर, व इतर मेहनत घेत आहेत.

Share This Article
Exit mobile version