प्रकाश आंबेडकरांची उद्या चिखलीत जाहीर सभा

editor 1 Min Read
1 Min Read
चिखली (तालुका प्रतिनिधी) – वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंतराव मगर यांच्या प्रचार सभेसाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या सभेचे आयोजन उद्या (दि.१९) राजा टॉवर चिखली येथे सकाळी १० वाजता करण्यात आलेले आहे. या सभेतून आंबेडकर कुणावर तोफ डागणार याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे.

बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रभर प्रस्थापितांच्या विरोधात विस्तापित असा लढा उभारलेला आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये वसंत मगर यांच्या माध्यमातून वंचित समुहाला अधिकृत उमेदवारी देऊन त्यांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करण्यासाठी आवाहन बाळासाहेब आंबेडकर उद्या करणार आहे. या सभेला वंचित आघाडीचे उमेदवार वसंतराव मगर, भारिप- बहुजन महासंघांचे अशोक सोनोने, जिल्हा प्रभारी धैर्यवर्धन फुंडकर, प्रदीप वानखेडे, प्रचार प्रमुख परशुराम बोराळे, महिला राज्य उपाध्यक्षा सविताताई मुंढे, शरदभाऊ वसतकार, मनोज निकाळजे यांच्यासह जेष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. तरी जिल्ह्यातील सर्व वंचित बहुजन आघाडीवर व बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर प्रेम करणार्‍यांनी हजारोच्या संख्येने राजा टॉवर चिखली, जि. बुलढाणा येथे सकाळी १० वाजता उपस्थित रहावे, असे आवाहन बुलडाणा जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे.

Share This Article
Exit mobile version