बिबी येथे श्रीराम नवमी उत्साहात साजरी

editor 1 Min Read
1 Min Read
बिबी (ऋषी दंदाले) – येथे प्रभू श्रीराम जयंती अर्थात श्रीराम नवमी उत्साहात साजरी करण्यात आली. पारंपरिक पद्धतीने हा कार्यक्रम साजरा झाला. ग्रामस्थांनी मनोभावे श्रीरामांचे पूजन करून दर्शन घेतले. श्रीराम प्रतिष्ठानकडून सर्व रामभक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.

बिबी येथे दरवर्षी श्रीराम नवनी पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाते. याही वर्षी हा कार्यक्रम पार पडला. काल, दि.१७ रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या बाजूला येथील श्रीराम प्रतिष्ठानच्यावतीने श्रीराम जन्मोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. गावातील सर्व जनतेला आमंत्रित करण्यात आले होते. टाळ-मृदंगाच्या गजरात बिबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील यांच्याहस्ते प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रतिमेचे पूजन झाल्यानंतर श्रीराम प्रतिष्ठानकडून सर्व रामभक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी श्रीरामांच्या दर्शनासाठी भाविक व रामभक्तांनी गर्दी केली होती.

Share This Article
Exit mobile version