नगर/शेवगाव (बाळासाहेब खेडकर) – अहमदनगर (दक्षिण) लोकसभा मतदारसंघात भाजपने डॉ. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे अहमदनगरची जागा भाजप गमावणार आहे, असा आरोप करत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आज मुंबईत प्रदेश कार्यालयात जाऊन सामूहिक राजीनामे दिले. त्यामुळे नगर जिल्ह्यातील भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. यासंदर्भात खुलासा करण्यासाठी भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी अहमदनगर शहरात पत्रकार परिषद घेतली. मात्र तेही उत्तरे देताना गोंधळून गेल्याचे दिसले.
अहमदनगर जिल्ह्यातील राजकारणात या राजीनम्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.पक्षांतर्गत नाराजी चव्हाट्यावर आल्याने विखे पाटलांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या पाच वर्षांमध्ये विखे पाटलांनी कार्यकर्त्यांकडे कोणत्याही प्रकारचे लक्ष दिले नाही तसेच शेवगाव पाथर्डी मतदार संघामध्ये कोणत्याही प्रकारच्या विकास कामांनाही चालना दिली नाही असे मत अनेक कार्यकर्त्यांचे आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते नाराज असल्याचे समोर येत आहे.
पत्रात पदाधिकाऱ्यांनी काय म्हटले?
मी सुनिल रामचंद्र राराने रा. शेवगाव जि. अहमदनगर गेल्या ४५ वर्षापासून पक्ष रचनेत मी व माझा परिवार काम करत आलो आहोत. माझे पिताश्री व मातोश्रींचा १९४२ च्या आणीबाणीच्या काळात आंदोलनात सक्रिय सहभाग होता तसेच अयोध्या येथील कार सेवेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे. या सर्व बार्बीचा आम्हास गर्व आहे. मी भारतीय जनता पार्टीच्या रचनेत शेवगाव शहर सरचिटनीस, शहर उपाध्यक्ष, तालुका उपाध्यक्ष, तालुका सरचिटणीस असे अनेक पदावरती सेवा दिली आहे. अटलबिहारी वाजपेयी, स्व. गोपिनाथ मुंडे साहेब, स्व. दिलीप गांधी साहेब, स्व. राजीवजी राजळे साहेब यांच्या प्रेरणेने काम करत आलो आहोत. परंतु येत्या २०२४ लोकसभा निवडणुकीकरता विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघ ३७ उमेदवारी दिल्याने भारतीय जनता पार्टीची नगर दक्षिण जाग ही धोक्यात येवू शकते. खासदार निवडुन गेल्यानंतर त्यांचा मतदार संघाशी संपर्क मोठया प्रमाणात तुटला आहे. नागरिकांचे, कार्यकत्यांचे फोन न उचलणे, समोरच्या व्यक्तीचे म्हणने ऐकून न घेता त्याला सुमार दर्जाचा सल्ला देणे, पार्टी म्हणजे मी, मी म्हणजे मतदार संघातील जनता असे म्हणून जनतेला, मतदाराला गृहित धरणे सिर्फ मुझे गिनो” या स्वभावामुळेच मागे जिल्ह्यात पक्षाच्या आमदारांना घरी बसविण्याचे पुण्य पार्टीच्या पदरात टाकण्याचे काम यांनी केले आहेत. तसेच मतदार संघात पायाभूत सेवेचा फज्जा उडलेला आहे. शेवगाव शहर व ग्रामीण भागात पिण्याचे पाणी, रस्ते, वैद्यकिय संस्था असतानाही जिल्हयाच्या बऱ्याच तालुक्यात मलेरिया, डेंग्यू आदी रोगांचा प्रादुर्भाव पाहायला मिळतो, आदी मुद्द्यांसह अनेक गंभीर मुद्द्यांवर या पत्रात प्रकाश टाकण्यात आलेला आहे.

