– आई आजारी असल्याची मारली थाप व उकळले पैसे
– ताे माझ्याशीही खाेटे बाेलला, परंतु फसवणूक झाली नाही – आ. श्वेता महाले
पुणे (ब्रेकिंग महाराष्ट्र) – चिखलीच्या भाजपच्या आमदार सौ. श्वेता महाले यांच्यासह भाजपच्या चार महिला आमदारांना अज्ञात भामट्याने ऑनलाईन गंडा घातला आहे. भाजपच्या आमदार आमदार माधुरी मिसाळ, श्वेता महाले, मेघना बोर्डीकर, देवयानी फरांदे या चौघींना एका भामट्याने फोन करून आई आजारी असल्याचे कारण देत, त्यांच्याकडून गुगलपे द्वारे रक्कम घेतली आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलिस त्या भामट्याचा शोध घेत आहेत. आपल्याला फाेन आला हाेता. पण, ताे खाेटा बाेलत असल्याने पैसे दिले नाहीत, असे आ. श्वेता महाले यांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने या महिला आमदारांकडे मदत मागितली होती. आई आजारी असल्याचे कारण देत, या व्यक्तीने महिला आमदारांकडून पैसे उकळले. या प्रकरणी पुण्यातील आमदार माधुरी मिसाळ यांची मुलगी पुजा मिसाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पुण्यातल्या बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ऑनलाईन माध्यमातून हे पैश्यांचे व्यवहार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. काल आमदार माधूरी मिसाळ यांना एका दुरध्वनीवरून फोन आला. यावेळी त्या त्यांच्या कार्यालयात होत्या. संबंधित व्यक्तीने त्याची आई आजारी आहे.
दरम्यान, मलाही मदतीसाठी फोन आला होता. मात्र आपण कसलीही मदत केली नाही. संबंधित तरुणाची संपूर्ण शहानिशा करून, हा खोटे बोलत आहे, याची माहिती घेतली होती. माझ्या मतदारसंघातील असल्याचे त्याने खोटेच सांगितले होते. त्यामुळे आपलीही काहीही फसवणूक झाली नाही, असे सांगत, तरीही अशा लोकांवर कारवाई ही झालीच पाहिजे, असे चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांनी सांगितले. खर्या गरजुला मदत ही झालीच पाहिजे. त्यामुळे अशा फसव्या लोकांवर कारवाई होणे गरजेचे आहे, असेही त्या म्हणाल्यात.

