बुलडाणा(विनोद भोकरे) :- करार पध्दतीने चालक पदाची भरती तात्काळ रद्द करुन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात शासनाने दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील चालक तथा वाहक सरळसेवा भरती २०१९ मधील सेवापूर्व प्रशिक्षण पूर्ण केलेल्या १३८ उमेदवारास तात्काळ नियुक्ता देण्यात याव्यात, तसेच अंतिम निवड यादीतील २६३ उमेदवारांचे तात्काळ प्रशिक्षण चालू करण्यात यावे, दुष्काळग्रस्त जिल्ह्यामधील सेवापूर्व प्रशिक्षण झालेल्या उमेदवारांची अंतिम चाचणी घेवून त्यांना तात्काळ नियुक्ती देण्यात यावी. तसेच प्रशिक्षण बाकी असणाNया उमेदवारांचे तात्काळ प्रशिक्षण सुरु करण्यात यावे यासह आदी मागण्यांसाठी सोमवार १८ जुलै रोजी सर्व प्रशिक्षण पूर्ण तसेच प्रशिक्षण बाकी असलेल्या उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भर पावसामध्ये आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. बुलडाणा विभागीय कार्यालयातील अधिकारी कच्छवे यांनी उपोषण कत्र्यांशी चर्चा केली, मात्र कोणत्याही प्रकारचे ठोस आश्वासन न दिल्याने उपोषण सुरुच आहे.
जिल्हाधकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात प्रशिक्षण पूर्ण तसेच प्रशिक्षण बाकी असलेल्या उमेदवारांनी म्हटले आहे की, उपोषणकर्ते दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची मुले असून त्यांचे चालक तथा वाहक सरळ सेवाभरती २०१९ मधील सेवापूर्ण झालेले तसेच काही जणांचे प्रशिक्षण बाकी असणारे उमेदवारांचे सेवापूर्व प्रशिक्षण पूर्ण झालेले असून अंतिम वाहन चाचणी अगोदर कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे अंतिम वाहन चाचणी होण्याअगोदर भरती थांवविण्यात आली. परंतु सद्यस्थितीला महाराष्ट्रातील कोरोना आटोक्यात आली असून सर्व निर्बंध हटविण्यात आले आहे. त्यामुळे सदर भरती प्रक्रिया पूर्वपदावर करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळ विभागीय कार्यालय बुलडाणा येथे वेळोवेळी संपर्क तसेच निवेदनाद्वारे पाठपुरावा करण्यात आला होता. त्यावेळी विभागीय कार्यालयाच्यावतीने सद्या आवश्यकता नाही, आवश्यकता भासेल त्यावेळी तुम्हाला बोलावून घेवू असे सांगण्यात आले असतांना देखील मनुष्यबळाची गरज भासली असतांना कंपनीला करार देवून रा.प.म.विभाग बुलडाणा येथील नियमबाह्य कंत्राटी चालक नेमले आणि त्यांना आगारस्तरावर नियुक्ता दिल्या. तसेच पुन्हा एसटीत ५००० हजार कंत्राटी चालकांची भरती तात्काळ होणार असल्याची माहिती शेखर चन्ने व्यवस्थापक संचालक एस.टी.महामंडळ यांनी एका वृत्तवाहिनीला दिली. दुष्काळग्रस्त जिल्ह्यामधील उमेदवारांवर अन्याय करुन उपोषण कत्र्यांना गाजर देवून एसटी.मध्ये निवृत्त कर्मचारी संख्या वाढली तर त्यांचा विस्तार करण्यात येईल, असे सांगितल्याने हा आमच्यावर अन्याय असून त्याचा उपोषण कर्त्यांनी निषेध नोंदवित ५ हजार कंत्राटी चालकांची भरती तसेच अगोदरचे कंत्राटी कर्मचाऱ्यांना ताबडतोब बंद करण्यात यावे, उपोषण कर्त्यांची अंतिम वाहन चाचणी तात्काळ घेवून कामावर रुजू करुन घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. या मागणीसाठी प्रशिक्षण पूर्ण तसेच प्रशिक्षण बाकी असलेल्या जयकुमार इंगळे, योगेश भोकरे, दौलत नप्ते, निलेश लंबे, विठ्ठल केदार, सचिन बुंदेले, अर्जुन इंगळे, मोहम्मद नुर अ.साजेद, सिध्दार्थ काकडे, उमेश वैद्य, महेंद्र गवई, अमजद पठाण, प्रदीप पाटील, लक्ष्मण मगरे, विष्णु धर्म, श्रीहरी तांबडे, अशपाक शेख, शशिकांत शेळके, श्रीकीष्णा सपकाळ, बाळासाहेब आटोडे यांच्यासह २५ प्रशिक्षण पूर्ण तसेच प्रशिक्षण बाकी असलेल्या उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे

