मुरमा सोसायटीच्या चेअरमनपदी प्रल्हाद मापारी; व्हाइस चेअरमन रामनाथ लेंभे बिनविरोध

editor 1 Min Read
1 Min Read

पाचोड (ब्रेकिंग महाराष्ट्र) – पैठण तालुक्यातील मुरमा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन व व्हाइस चेअरमन पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली.  सोमवारी (दि.१८)रोजी पार पडलेल्या बैठकीत चेअरमनपदी प्रल्हाद मापारी तर व्हाइस चेअरमनपदी रामनाथ लेंभे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

मुरमा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली होती. निवडणूक अधिकारीच्या अध्यक्षतेखाली चेअरमन व व्हाइस चेअरमन निवडीसाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.  यात चेअरमनपदासाठी प्रल्हाद मापारी व व्हाइस चेअरमन रामनाथ या दोघांचाच अर्ज आल्याने या दोघांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. निवडीनंतर नूतन चेअरमन,  व्हाइस चेअरमन तसेच संचालकांचा सत्कार करण्यात आला असुन, नवनिर्वाचित संचालक मंडळात १३ सदस्य बिनविरोध निवडून आले असून, सर्वसाधारण विलास संदीपान भुमरे, प्रभाकर पांडुरंग चिडे, श्रीमत पांडुरंग मापारी, नरहरी कडूजी मानमोडे, दत्तात्रय रंगनाथ फटांगडे, गोपीचंद तुकाराम पांगरे, महिला राखीव ज्योती रेवनाथ भोसले, अलकाबाई कल्याण मापारी, वि.जा.भ.जा. सूर्यभान नाथा नेमाने, ईतर मागासवर्गीय बबन वैजिनाथ शिंदे, अनुसूचित जातीजमाती नंदू भाऊसाहेब आहेर हे बिनविरोध निवडून आले आहे.

Share This Article
Exit mobile version