डॉ. विकास मिसाळ यांच्या प्रयत्नांना यश; मलगी ते इसरूळ रस्त्याच्या कामाला अखेर सुरूवात!

editor 3 Min Read
3 Min Read

– आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या पुढाकारातून लागला रस्त्याचा प्रश्न मार्गी!

चिखली (महेंद्र हिवाळे) – देऊळगावराजा उपविभागाअंतर्गत येणार्‍या मलगी ते इसरूळ या रस्त्याच्या दुरूस्तीचे काम आज (दि.१८) अखेर सुरू झाले असून, या रस्त्याच्या कामासाठी देऊळगावराजा येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाचा इशारा देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ. विकास मिसाळ यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. डॉ. मिसाळ यांनी परिसरातील मिसाळवाडी, पिंपळवाडी, शेळगाव आटोळ, इसरूळ या गावांतील सरपंचांना सोबत घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले होते, तसेच १५ दिवसांत रस्त्याचे काम सुरू न झाल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला होता. आज ठिय्या आंदोलनापूर्वीच या रस्त्याचे काम सुरू झाले आहे. आमदार तथा माजी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रयत्नातून या रस्त्याच्या दुरूस्ती व मजबुतीकरणासाठी यापूर्वीच निधी मंजूर झालेला आहे.

मलगी फाट्यापासून पुढे इसरूळपर्यंत असलेल्या या रस्त्याची सद्या प्रचंड दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. त्याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ. विकास मिसाळ यांनी इसरूळचे सरपंच सतिश पाटील भुतेकर, मंगरूळचे सरपंच गणेशराव शिंदे, मिसाळवाडीचे सरपंच बाळू पाटील, शेळगाव आटोळचे उपसरपंच संतोष बोर्डे, यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य तसेच राष्ट्रवादी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष राजीव जावळे, ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य बाजीराव देशमुख व ग्रामस्थांसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची भेट घेतली होती. मलगी फाटा ते इसरूळ हा रस्ता प्रमाणीपेक्षा जास्त खराब झाला असून, या रस्त्यावर वाहने चालविणे धोकादायक झाले आहे. त्यामुळे १५ दिवसांत हा रस्ता दुरूस्त न केल्यास परिसरातील ग्रामस्थांसह ठिय्या आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आला होता. त्यावर अतिशय सकारात्मक अशी भूमिका घेत, कार्यकारी अभियंत्यांनी त्यापूर्वीच हा रस्ता मजबुतीकरण व दुरूस्ती करू, असे आश्वासन देत लगेच पुढील कार्यवाहीचे आदेशदेखील आपल्या यंत्रणेला दिले होते. तरीदेखील प्रत्यक्ष काम सुरू व्हायला वेळ लागत असल्याने संतप्त झालेले डॉ. मिसाळ व त्यांचे सहकारी हे आज (दि.१८) देऊळगावराजा येथे ठिय्या आंदोलन करणार होते. परंतु, तत्पूर्वीच बांधकाम विभागाने कामाला सुरूवात केल्याने त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले आहेत.

Contents
– आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या पुढाकारातून लागला रस्त्याचा प्रश्न मार्गी!चिखली (महेंद्र हिवाळे) – देऊळगावराजा उपविभागाअंतर्गत येणार्‍या मलगी ते इसरूळ या रस्त्याच्या दुरूस्तीचे काम आज (दि.१८) अखेर सुरू झाले असून, या रस्त्याच्या कामासाठी देऊळगावराजा येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाचा इशारा देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ. विकास मिसाळ यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. डॉ. मिसाळ यांनी परिसरातील मिसाळवाडी, पिंपळवाडी, शेळगाव आटोळ, इसरूळ या गावांतील सरपंचांना सोबत घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले होते, तसेच १५ दिवसांत रस्त्याचे काम सुरू न झाल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला होता. आज ठिय्या आंदोलनापूर्वीच या रस्त्याचे काम सुरू झाले आहे. आमदार तथा माजी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रयत्नातून या रस्त्याच्या दुरूस्ती व मजबुतीकरणासाठी यापूर्वीच निधी मंजूर झालेला आहे.

मलगी ते इसरूळ या रस्त्याच्या कामासाठी आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर झालेला असून, हा रस्ता निविदा प्रक्रियेत अडकला आहे. त्यामुळे रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली तरी सार्वजनिक बांधकाम खाते या रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम करू शकत नव्हते. परंतु, डॉ. विकास मिसाळ यांच्या पुढाकारानंतर हा प्रश्न मार्गी लागला असल्याने पंचक्रोशीतील गावात समाधान व्यक्त केले जात आहे.
—————-

मलगी ते इसरूळ रस्ता मजबुतीकरणाच्या कामास लवकरच सुरूवात!

Share This Article
Exit mobile version