– झोटिंगा येथील मेळाव्याला तुफान प्रतिसाद, जेसीबीने पुष्पवृष्टी करून गावकर्यांनी केले स्वागत
– जिल्ह्यात आता परिवर्तन अटळ : रविकांत तुपकर
– जिल्ह्यात आता परिवर्तन अटळ : रविकांत तुपकर
बिबी, ता. लोणार (ऋषी दंदाले) – जिथे जावे तिथे नागरिकांचा ओसंडून वाहणारा प्रतिसाद मला दररोज लढण्याची नवी ऊर्जा देत आहे, हा उत्साह, वाढता प्रतिसाद आणि प्रेम पाहून अशी खात्री पटली आहे की, ही लोकसभेची निवडणूक माझी एकट्याची नसून ती खर्याअर्थाने लोकांची निवडणूक बनली आहे. आता गावोगावी वातावरण पेटले असून नागरिकांनीच आता ही निवडणूक हाती घेतली आहे, त्यामुळे आता जिल्ह्यात परिवर्तन अटळ आहे, असा विश्वास शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सिंदखेडराजा तालुक्यातील झोटिंगा येथील निर्धार मेळाव्यात बोलतांना व्यक्त केला. दरम्यान, मेहकर व सिंदखेडराजा तालुक्यांत तुपकरांच्या निर्धार परिवर्तन यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून, बुलढाणा जिल्हावासीयांनी रविकांत तुपकर हेच आमचे आता खासदार आहेत, असे एकमुखाने निक्षून सांगणे सुरू केले आहे. तुपकरांच्या विजयाची आता फक्त औपचारिकता उरली असल्याचे त्यांना मिळत असलेल्या प्रतिसादावरून दिसून येत आहे.
दरम्यान, सिंदखेडराजा तालुक्यातील वाघाळा गावातही रविकांत तुपकर यांना जोरदार प्रतिसाद मिळाला. महाशिवरात्रीच्या दिवशी ग्रामदैवत वाघाळेश्वराची तुपकर पती-पत्नीच्याहस्ते महापूजा करण्यात आली होती. काँग्रेसच्या एका पदाधिकार्याने तर तुपकरांना एक लाख रूपये मदत जाहीर केली.
त्याचबरोबर, अंढेरा येथील निर्धार मेळाव्यालाही गावकर्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. मला सत्तेची आणि पदाची लालसा मुळीच नाही, परंतु कष्टकर्यांचा, शेतकर्यांचा, सर्वसामान्यांचा आवाजही सभागृहात पोहोचला पाहिजे. यासाठी शेतकरी, कष्टकरी व तरुणांच्या आग्रहास्तव आपण ही निवडणूक लढवित आहोत. त्यानंतर आता परिवर्तन निर्धार यात्रेनिमित्ताने गावागावात मिळणारा तुफान प्रतिसाद पाहता मला अशी खात्री पटली की, लोकसभेची निवडणूक माझी एकट्याची नसून ती खर्या अर्थाने लोकांची निवडणूक बनली आहे. आता गावोगावी वातावरण पेटले असून नागरिकांनीच आता ही निवडणूक हाती घेतली आहे, त्यामुळे परिवर्तन अटळ आहे, अशा भावना यावेळी रविकांत तुपकरांनी व्यक्त केल्या. सोयाबीन-कापसाला भाव मिळावा, पीकविमा, अतिवृष्टीची नुकसान भरपाई यासाठी विविध आंदोलने केली. गेल्या वर्षी आत्मदहनाच्या आंदोलनावेळी सत्ताधारी लोकप्रतिनिधीच्या सांगण्यावरून पोलिसांनी लाठीमार केला आणि आम्हाला तुरुंगात टाकले. त्यावेळी झालेल्या वेदना आणि जखमा आता जनतेच्या प्रेमाने भरून निघाल्या आहेत. गेल्या २२ वर्षात मी शेतकरी, कष्टकरी, तरुण आणि सर्वसामान्य जनतेसाठी रस्त्यावरची लढाई लढली आहे. या २२ वर्षात मी सत्ता, पैसे, पद जरी कमावले नसले तरी गावगाड्यातील जनतेचा विश्वास, प्रेम आणि आशीर्वाद कमावले. जीवाभावाची लाखो माणसे कमावली, आणि हीच माझी खरी संपत्ती आहे, या संपत्तीच्या जोरावरच मी लोकसभेची निवडणूक लढत आहे, गावोगावी मिळणारा प्रचंड प्रतिसाद, सर्वसामान्यांचे प्रेम आणि आशीर्वाद पाहता आता ही लढाई केवळ माझी एकट्याची उरली नाही तर जनतेने ही लढाई आता हाती घेतली आहे, त्यामुळे आता जिल्ह्यात परिवर्तन अटळ आहे, असा विश्वास रविकांत तुपकरांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला. झोटिंगा येथील नागरिकांची गर्दी व उत्साह हा लोकसभेच्या निकालाची चुणूक दाखविणारा ठरला.
झोटिंगावासीयांनी केले तुपकरांचे भव्यदिव्य स्वागत!
रविकांत तुपकरांचे झोटींगा गावात आगमन होताच गावकर्यांनी फटाक्यांची प्रचंड आतषबाजी केली. त्यानंतर डिजेच्या तालावर खुल्या गाडीतून तुपकरांची संपूर्ण गावातून मिरवणूक काढत त्यांच्यावर जेसीबीतून फुलांचा प्रचंड वर्षांव केला. तर दारोदारी मायमाऊल्यांनी औक्षण केले. यावेळी तरुणांचा व गावकर्यांचा प्रचंड जल्लोष बघायला मिळाला. रविकांत तुपकरांचे गावोगावी होणारे जंगी स्वागत व सभांना होणारी प्रचंड गर्दी बघता त्यांची जिल्हात लाट निर्माण झाली आहे.
मेहकर तालुक्यातही निर्धार परिवर्तन यात्रेचा झंझावात;
शेतकरी कष्टकर्यांचा आवाज झाला बुलंद!
शेतकरी कष्टकर्यांचा आवाज झाला बुलंद!

