सोलापूर पार्क चौपाटी हटविणार, पार्किंग करणार!

editor 1 Min Read
1 Min Read

सोलापूर (ब्रेकिंग महाराष्ट्र) – सोलापूर पार्क चौपाटी एका महिन्यात हटविणार असल्याचे सांगून, पार्किंगसाठी जागा करणार असल्याचे महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले आहे. त्यामुळे चौपाटीवरील अतिक्रमणे हटविण्याचा मार्ग मोकळा झाला असून, शहरवासीयांचा श्वास गुदमरला होता, तो आता मोकळा होणार आहे.
सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पार्क स्टेडियमनजीकची पार्क चौपाटी एक महिन्यात रिकामी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त पा.r शिवशंकर यांनी अखेर दिले आहेत. शहराचा पार्विंâगचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी व पार्किंगसाठी ही जागा खुली करण्यात येणार आहे. पार्क चौपाटीसंदर्भात मान्यता नव्हती, तसेच ही जागा सक्षम मान्यता नसतानादेखील तेथील विक्रेत्यांनी वापरली आहे. केवळ स्थायी समितीमध्ये याचा ठराव झाला आहे. वास्तविक पाहता महापालिका सर्वसाधारण सभेमध्ये हा विषयासंदर्भात ठराव होणे गरजेचे होत्, पण तसे झाले नाही. तेथील विक्रेत्यांनी सक्षम मानता घेतली नाहा,r तसेच कब्जापावती संबंधित विक्रेत्यांकडे नाही. यामुळे ही जागा एका महिन्यात खाली करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत. अनेक विक्रेत्यांनी तर येथे अतिक्रमण केले आहे. त्यामुळे चौपाटीची जागा मोकळी होऊन तेथे पार्विंâग होणार असल्याने सोलापूरकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
————

Share This Article
Exit mobile version