राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त सहकार विद्या मंदीर बिबी येथे विज्ञान प्रदर्शन

editor 1 Min Read
1 Min Read
बिबी (प्रतिनिधी) – येथील सहकार विद्या मंदिरात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा झाला. यानिमित्त विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात विद्यार्थी, विद्यार्थिनींनी विविध उपकरणे सादर करून वाहवा मिळवली.

सहकार विद्या मंदिर बिबी ता. लोणार येथे आज (दि.28) विद्यार्थ्यांसाठी शालेयस्तरावरील विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला आणि चिकित्सक वृत्तीला चालना मिळाली. या प्रदर्शनाचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक श्री. तरवडे सर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी शाळेतील इयत्ता पहिली ते तिसरी, चौथी ते सहावी व सातवी ते नववी अश्या गटामध्ये हे प्रदर्शन होते . विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक प्रयोगकृती मांडलेल्या होत्या. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी या वैज्ञानिक प्रयोगांना भेट देऊन त्याची माहिती जाणून घेतली. तसेच विज्ञान दिनानिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या प्रदर्शनाचे आयोजन शाळेतील सर्व विज्ञान शिक्षक व शिक्षिका यांनी केले होते.

Share This Article
Exit mobile version