शाळेचे लोखंडी गेट अंगावर पडल्याने ७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू

editor 1 Min Read
1 Min Read

बुलडाणा( महाराष्ट्र ब्रेकिंग): आश्रम शाळेतील लोखंडी गेट अंगावर पडल्याने ७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही घटना बुलडाणा तालुक्यातील येळगाव येथे १६ जुलै रोजी धक्कादायक घटना घडली.

जळगाव जमोदला लागून असलेल्या मध्यप्रदेशच्या खंडवा जिल्ह्यातील नेमसेडी येथील रोशन रमेश दुबे वय ७ हा बुलडाणा तालुक्यातील येळगाव येथील आदिवासी आश्रम शाळेत दुसऱ्या वर्गात शिकत होता. दरम्यान १६ जुलै रोज शनिवारी सकाळी शाळा सुटल्यानंतर रोशन दुबे हा आश्रम शाळा परिसरातील मोठ्या लोखंडी गेटसोबत खेळत होता. खेळता खेळता लोखंडी गेट अचानक रोशनच्या अंगावर पडल्याने त्याच्या डोक्याला मार लागून गंभीर झाला. यावेळी आश्रम शाळेच्या वसतिगृहाचे अधीक्षक अंकुश जाधव व राजेश राठोड यांनी रोशनला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले . मात्र डॉक्टरांनी रोशनला मृत घोषित केले. बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून बुलडाणा शहर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Share This Article
Exit mobile version