सांघिक खेळांच्या आयोजनामुळे सामाजिक एकोपा निर्माण होतो – गजानन वायाळ

editor 1 Min Read
1 Min Read
चिखली (कैलास आंधळे) – तालुक्यातील अमोना येथे खंडोबा यात्रेनिमित्त अत्यंत चुरशीचे असे कबड्डी सामने पार पडले. या सामन्यांचे उद््घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन वायाळ यांच्याहस्ते झाले होते. खेळाच्या संघांमध्ये विविध जातीधर्माचे तरुण एकत्र येतात आणि सांघिक भावना निर्माण होते. त्यांच्या मधला संवाद वाढतो आणि एक सक्षम पिढी देशाला मिळते, असे प्रतिपादन वायाळ यांनी याप्रसंगी केले.

अमोना गावामध्ये दरवर्षी प्रमाणे ह्यावर्षी खंडोबा यात्रा अतिशय उत्साहात पार पडली. यानिमित्त शंकरपटाचे भव्य आयोजन करण्यात आले होते, तसेच कबड्डीचे सामने खेळविल्या गेले. या सामन्यांत जिल्ह्यासह जिल्हाबाहेरील संघांनीसुध्दा सहभाग घेतला. या सामन्यांचे उदघाटन गजानन वायाळ यांनी केले तर प्रमुख पाहुणे म्हणून पप्पूसेठ राजपूत, शिवाजी गाडेकर, विष्णूभाऊ घुबे, गौतम साळवे, शामभाऊ जाधव, भगवान रक्ताडे सर, दिलीपमामा शितोळे, अंकुश थुट्टे, अक्षय सुरुशे, गोपाल सुरुशे, भागवत सुरुशे, सरपंच प्रल्हाद इंगळे, लहुभाऊ वानखेडे, शिवदास भांदर्गे, सुनिताताई इंगळे-पोलीस पाटील, शालेय व्यवस्थापन समिती जि.प.अमोना, तंटामुक्ती अध्यक्ष गजानन वाघ, राजूभाऊ जायभाये व गावकरी उपस्थित होते.

Share This Article
Exit mobile version