गोठ्यावर विद्युत तार कोसळली, १३ जनावरे ठार

editor 1 Min Read
1 Min Read

वाशिम : गोठ्यावर जीवंत विद्युत तार कोसळल्याने ८ म्हशी व ५ बकर्‍या जागीच ठार झाल्याची दुर्देवी घटना वाशिम जिल्ह्यातील अनसिंग येथे घडली आहे. या घटनेत किसनसिंग ठाकूर या शेतकर्‍याचे तब्बल ८ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

जीर्ण झालेल्या विद्युत वाहिन्या दुरुस्त करण्याची मागणी वेळोवेळी करूनसुद्धा वीज वितरण कंपनी याकडे लक्ष देत नसल्याने संबंधित शेतकर्‍यास या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देत पंचनामे करून भरीव मदत करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहे.

Share This Article
Exit mobile version