मेरा बु , ता . चिखली (प्रताप माेरे) – गुंजाळा येथील शेतकऱ्यांनी पेरणीसाठी देऊळगावमही येथील कृषी केंद्रामधून डीएपीचे खत विकत आणले होते. मात्र दुकानदाराने चक्क शेतकऱ्यांच्या माथी बोगस डीएपीचे खत मारल्याचा आराेप शेतकर्याने केला आहे. हा प्रकार उघडकीस येताच, कृषी अधिकारी सोनुने व उगले यांनी पंचासमक्ष या खताचे नमुने घेवून तपासणीसाठी पाठविण्यात आले. अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
कृषी अधिकारी यांनी पंचनामामध्ये नमूद केले की, गुंजाळा येथील शेतकरी समाधान कारभारी केदार यांनी देऊळगावमही येथील कृषी केंद्रामधून कृषक भारती कॉ ऑपरेटीव्ह लि. डीएपी १८:४६:० नोयडा कंपनीचे चे १० पोते खत विकत आणले होते . त्यांनी शेतात खताची पेरणी केली असता खत जमिनीत विरघळले नाही , खताचा रंग पिवळा , पाण्यात टाकले विरघळले नाही , अशा तक्रारी वरून डीएपी खताची पाहणी केली असता, सिलबंद बॅगवर लिहलेले होते की Imported kribhco, kribhco DAP. 18:46:0, phosphate, N: 18%, P7 46%, Pcs 46%, Pus 39.5% Di- Ammoniu Imported, packed of marketed by Krishale Bharah Coope rative Limited (a ) A- 8-10, Seepr-1 001d4 – 2013000) Sr. JF. 50.129 1g. wel wet. 50 14 21650, Lot no: 02, S017 Subsidy per bag month /Meat of impost Dec 2021 email- adeshkumar@ kri bhanek MRP. 1350. असे लिहले आहे . त्यानी १० बॅग डीएपीचे खत आणून त्यामधील ९ बॅगची पेरणी केली आणि एक बॅग घरात शिल्लक होती. त्यांच्याकडे दे मही येथील कृषी केंद्र यांचे बिल क्र ४५० दि. ८ जून २०२२ बॅग किंमत १३५० एकुण रुपये ९३४०० आहे . याच दुकानामधून गुंजाळा गावात अनेक शेतकऱ्यांनी डीएपी खत विकत आणले आहे . मात्र त्यांनी शेतात पेरणी केली आहे, त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये खळबळ उडाली आहे .
याबाबत कृषी अधिकारी सोनुने यांना विचारले असता, त्यांनी माहिती दिली की, पंचासमक्ष खताचे नमुने घेतले आहेत. घेतलेले नमुने अमरावती प्रयोगशाळेत पाठविल्या जाईल, जोपर्यत प्रयोगशाळेतून खत बोगस निष्पन्न होत नाही, तोपर्यंत खत बोगस असल्याचे सिद्ध होत नाही . जर बोगस रिपोर्ट आल्यास देऊळगाव मही येथील कृषी केंद्राचा परवाना रद्द करण्यात येईल. व पुढील कारवाई केली जाईल. यावेळी गजानन नागरे, जगन्नाथ केदार, अर्जुन घुगे , प्रल्हाद थोरवे यांच्या पंचनाम्यावर सह्या आहेत.

