बाजार समितीत सीसीआय कापूस खरेदी केंद्र सुरू!

Contents
– कापसाला मिळाला ७०२० रूपयांचा हमीभावदेऊळगावराजा (राजेंद्र डोईफोडे) – परिसरातील कापूस उत्पादक शेतकर्यांच्या कापसाला अपेक्षित भाव मिळावा म्हणून हमीभावाने सीसीआय खरेदी केंद्र मंजूर झाले असून, काल (ता.३०) बाजार समिती यार्डात सभापती समाधान शिंगणे यांच्याहस्ते खरेदीला सुरुवात झाली. यासाठी कॉटन कॉर्पोरेशनकडे माजी मंत्री, आ.डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी पाठपुरावा केला होता. बाजार समिती यार्डात कापूस खरेदी उद्घाटनप्रसंगी बायगाव येथील शेतकरी भास्कर आघाव यांचा शाल श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. सभापती समाधान भिकाजी शिंगणे यांनी काटा पूजन करून विक्रीसाठी आणलेला कापसाला ७०२० रूपये भाव देण्यात आला. सी.सी.आय.चे ग्रेडर श्री. डहाके यांनी ओलावा तपासून शेतकर्यांची ऑनलाईन नोंदणी केली व त्यानंतर कापूस खरेदीला सुख्यात करण्यात आली.
