बुलढाण्याचे राजकारण मुद्द्यावरून गुद्द्यावर!

editor 1 Min Read
1 Min Read

बुलढाण्याचे राजकारण मुद्द्यावरून गुद्द्यावर!

– असल्या पांचट धमक्यांना भीक घालत नाही, शेतकरी जशाच तसे उत्तर देतील; रविकांत तुपकरांनीही आ. रायमुलकरांना ठणकावले!

बुलढाण्याचे राजकारण आता मुद्द्यावरून गुद्द्यावर आलेले आहे. मेहकर तालुक्यातील एका जाहीर सभेतून आमदार संजय रायमुलकर यांनी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना खासदार साहेबांवर (प्रतापराव जाधव) बोलशील तर स्टेजवर येऊन कानपट्टीचे माफ घेईल, अशा शब्दांत जाहीरपणे धमकी दिली होती. या धमकीला लढवय्ये शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनीदेखील जशाच तशे उत्तर दिले आहे. सोयाबीन-कापसावर बोलण्याऐवजी सत्तेची मस्ती चढलेले हे लोकं मारामारीची भाषा करत आहेत. आ. रायमुलकरांच्या पांचट धमक्यांना अजिबात भीक घालत नाही, शेतकरी यांना जशाच तसे उत्तर देतील, अशा शब्दांत ठणकावत आ. रायमुलकर यांचा सूचक इशारा दिला आहे.

Share This Article
Exit mobile version