शेतीच्या वादातून महिलेला जीवे मारण्याची धमकी देऊन मारहाण

editor 1 Min Read
1 Min Read
देऊळगाव राजा (राजेंद्र डोईफोडे) – शेतीच्या वादातून महिलेला मारहाण व धमकी दिल्याप्रकरणी देऊळगावराजा पोलिसांनी दि. १९ जानेवारीरोजी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी बायगाव येथील गंगुबाई पाटोळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कारभारी कायंदे, अनिल कायंदे, योगेश कायंदे या आरोपींविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत.

सविस्तर असे, की सन २०२२ साली गंगुबाई यांनी त्यांच्या नावे असलेली शेत जमीन कारभारी कायंदे यांना विकली होती. दरम्यान, कायंदेंनी पूर्ण मोबदला न देता काही रक्कम त्यांना दिली. त्यांनतर त्याने मागील वर्षी चार कोरे चेक दिले, मात्र ११ जानेवारी रोजी चेक जमा करण्यावेळी खात्यात कमी पैसे असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे गंगुबाई विचारणा करण्यासाठी कायंदे यांच्याकडे गेल्या. आता तुम्ही उद्या या तुम्हाला पैसे देतो, असे त्यानी म्हटले. सांगितल्याप्रमाणे गंगुबाई मेहुणाराजा फाटा येथे पोहोचल्या. त्यावेळी चेक आणि पैसे देण्यावरून झटपट झाली. त्यामध्येच तू आमच्या दुकानावर पैसे मागायला कशी आली ? तुझी हिंमत तरी कशी झाली ? असे म्हणून कायंदेनी गंगुबाईंना मारहाण केली, शिवीगाळही केली. त्याच्यासोबत अनिल कायंदे, योगेश कायंदे सुध्दा होते. पुढे त्यांनी गालावर चापटा मारल्या. तुझे पैसे पण देत नाही, आणि जमीनही देत नाही असे म्हणून खानदान जीवे मारण्याची धमकी कायंदेनी दिली, असे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार संतोष महल्ले करत आहेत.

बुलढाण्याची उमेदवारी तुपकरांना; जिल्ह्यात येवूनही राजू शेट्टींनी भेट मात्र टाळली!

Share This Article
Exit mobile version