नंदुरबार (ब्रेकिंग महाराष्ट्र) :- जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील दूर्गम भागात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका येथील रस्त्यांना बसला आहे. तीन दिवसांपुर्वी झालेल्या पावसाने पिंपळखुटा ते गमण दरम्यान वळण रस्त्यावर अनेक ठिकाणी दरड कोसळल्या आहे. यामुळे वाहनधारकांची प्रचंड गैरसोय होत आहे. विशेष म्हणजे दरड कोसळून आता चवथा दिवस उजाडला तरी जिल्हा प्रशासनाने दरड बाजुला न केल्यामुळे नागरीकांना मोठे हाल सहन करावे लागत आहे. या परिसरातील आवलीफाटा, चिखनीपाडा, छापरीउंबर, रोहय्याबारी, कोराई, दराबारी, मोगरीबारी, जांगठी, शेंदुरी, सिपान, मणिबेली ह्या गावाचे रस्ते प्रभावीत झाले आहेत. त्यामुळेच याबाबत तात्काळ उपाययोजना करण्याची गरज नागरीकांनकडून व्यक्त होत आहे.

