अवैध धंदे बंद करा; छावा संघटनेचा रस्ता रोको!

editor 1 Min Read
1 Min Read
देऊळगावराजा (राजेंद्र डोईफोडे) – देऊळगांव राजा व सिंदखेडराजा तालुक्यातील देऊळगांवराजा, सिंदखेडराजा व किनगांवराजा पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने ते बंद करून संबंधित बीट जमदारांवर कारवाई करण्यासाठी आज (दि.२५) दुपारी १२ वाजता सिंदखेडराजा येथील छत्रपती शिवाजीनगर टी पाँईटजवळ छावा जिल्हाध्यक्ष अशोकराजे जाधव यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात छावा सैनिक मातृतीर्थावर दाखल झाले होते.

आज दुपारी १२ वाजता झोपलेल्या पोलीस प्रशासनाला जागे करण्यासाठी व तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी जयघोषात रस्ता रोको करण्यात आला. यावेळी गोविंदराव टेके, बाळासाहेब शेळके, संजय ऊगले, शंकर शिंदे, अमोल काकडे, बजरंग काळे, सुदामराव कळकुंबे, नारायण म्हस्के, अर्जुन जाधव, राहुल काकडे, सखाराम एखंडे, संजय राऊत, प्रल्हाद राठोड, समाधान काकडे, बबन जाधव, विनायक राठोड, डिगांबर शिंदे, दिलीप राठोड, बाजिराव हरने, आदी उपस्थित होते. शेवटी पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने रस्ता खुला करण्यात आला. पोलिस प्रशासनाने अवैध धंदे बंद न केल्यास गृहमंत्र्यांना भेटून न्याय मागणार असल्याची प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष अशोकराजे जाधव यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना दिली.

Share This Article
Exit mobile version