चिखली (कैलास आंधळे) – मराठी पत्रकार परिषदेचे श्रीक्षेत्र माहूरगड येथे दि. १३ जानेवारीरोजी पत्रकारांचे राज्य अधिवेशन व आदर्श जिल्हा व तालुका पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा होत असून, या सोहळ्यास जिल्ह्यातील जास्तीत जास्त पत्रकार बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिल उंबरकर यांनी चिखली येथे केले. येथील लक्ष्मी प्रल्हाद वेल्फेअर फाउंडेशन जापनीज लँग्वेज प्रशिक्षण केंद्र जाफराबाद रोड चिखली येथील कॉलेजमध्ये मराठी पत्रकार परिषद संलग्नित डिजिटल मीडिया परिषदेच्या चिखली व देऊळगावराजा तालुका कार्यकारिणीची सभा काल, दि.२४ डिसेंबर रोजी पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी डिजिटल मीडीया परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिल उंबरकर होते. तर जिल्हा संघटक नारायण दाभाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डिजिटल मीडिया परिषदेच्या चिखली व देऊळगावराजा तालुका कार्यकारिणीतील पदाधिकारी व सदस्यांना नियुक्तीपत्राचे वितरण करण्यात आले.
मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनासाठी चिखली, देऊळगावराजा तालुक्यातील पत्रकार सज्ज!

