चोरपांग्रा येथे विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

editor 1 Min Read
1 Min Read
बिबी (ऋषी दंदाले) – येथून जवळच असलेल्या चोरपांग्रा येथील ४५ वर्षीय विवाहितेने अज्ञात कारणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली आहे. या महिलेच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून, अधिक तपास बिबी पोलिस करत आहेत.

सविस्तर असे, की आज (दि.२१) सकाळी दुर्गा सुदाम खंड (वय ४५) रा. चोरपांग्रा, तालुका लोणार या महिलेने निवृत्ती अमृता डहाळके राहणार चोरपांग्रा गट नंबर १३७ गोवर्धनगर शिवार यांच्या शेतातील रोडलगत असलेल्या विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली. डहाळके हे शेतकरी विहिरीवरील मोटार चालू करण्याकरिता गेले असता, त्यांना या महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. या महिलेच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसून, त्या महिलेच्या पश्चात दोन मुले, पती व बराच मोठा परिवार आहे. पुढील तपास बिबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली किनगावजट्टू बीटचे जमादार परमेश्वर शिंदे व त्यांचे रायटर रवी बोरे हे करीत आहे.

Share This Article
Exit mobile version